Ashich Pan Vishesh Observations.
असच पण विशेष : काही निरीक्षणे "शाळा कोणतीही असु देत हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड किंवा इतर कोणतीही; शाळेबाहेर ऐकु येणारा गोंगाट हा सर्व ठिकाणी सारखाच असतो! " त्याचप्रमाणे, नवरा अणि बायको कुठल्याही प्रांतातले असू दया, त्यांची खुसपुस तसेच भांडण सारखीच वाटतात. माणसाचे जीवन म्हणजे आसक्ति पासून ते विरक्ति पर्यंतचा प्रवास असतो. लहानपणी चॉकलेट अणि खेळण्यांमधे गुंतणारा माणुस, मोठा झाल्यावर वेगळ्या गोष्टीत गुंतत जातो. आणि शेवटी हातात सर्व असलं तरी त्याच मन लागत नाही... तेथेच विरक्तिचा प्रवास सुरू होतो. शिक्षकांना आवडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षकही आवडतेच असतात. न आवडणाऱ्याच्या बाबतीत पण तेच असतं. रस्त्यावरच्या कचऱ्याची तक्रार करणारा, स्वता: त्या रस्त्यावर कचरा करतांना मागे पुढे पाहत नाही. पुण्यात माणसाच्या डोक्याची मंडई होते, तर मुंबईत डोक्याची दही होते. *( पुण्यात मंड़ई मुंबईत दहिसर भाग आहेत.) माणूस अर्थशास्रीय गुंत्यात असेल तर त्याला मै...