Posts

Showing posts from June, 2021

बोरविहिरचे ताई-तात्या आणि भावडु मामा

Image
आज बोरविहीर च्या ताईंचे ( आजी) निधन झाले आणि अनेक आठवणी तरळून आल्या. वडिलांची १९८७ ला बोरविहीर ह्या गावी कारखान्यात नियुक्ती झाली.  गावात राहत असताना श्री. सीताराम तात्या आणि सौ. भूरा ताई ह्या प्रेमळ दापंत्याशी ओळख झाली. एक मुलगा (भावडू मामा) आणि  चार मुली असलेल्या ताई तात्यांनी माझ्या आईला पाचवी मुलगीच मानले. आणि हा ऋणानुबंध आजही जपला जातोय. लाकूड फोडत असलेल्या तात्यांना मदत म्हणून माझे वडील ( नाना) स्वतः हुन पुढे गेले. तात्यांना वाटलं हा नोकरदार माणूस काय लाकूड फोडेल. पण नाना शेतकरी कुटुंबातले तरुण , त्यांनी लगेच ते काम कोणतीही लाज न बाळगता पूर्ण केले. तात्यांनी लगेच ताईंजवळ सांगितले की , हा माणूस वेगळा आहे. ताई तात्यांशी तेंव्हापासून ओळख झाली.  पुढे अमित दादाचा ( माझा मोठा भाऊ ) जन्म झाला आणि त्याला ताई तात्यांच्या घरीच आजोळ लाभलं. लहानपणापासून दादाला त्यांचा  आणि त्यांना दादाचा लळा लागला आणि एक घट्ट नातं तयार झालं. शेतातून बैलगाडी वर येणाऱ्या तात्यांची बराच पुढे जावून दादा वाट पाहत बसे. मग तात्या त्याला बैलगाडीतून घरी आणत. त्या बैलगाडीला तसचं सोडून अग...

डोंगर खाणारे प्राणी

Image
डोंगर खाणारे प्राणी        टेकडी पासून पर्वतापर्यंत विविध आकारात या भूतलावर खंबीरपणे त्याचे अस्तित्व टिकून उभा असतो तो डोंगर! बहुतांश लोकांच्या आवडत्या देखाव्याच्या चित्रांमध्ये, सूर्याच्या आजूबाजूला व्ही (V) आकाराची दरी करणारे ते दोन डोंगर! भूमातेच्या स्तनांची उपमा असलेले हेच डोंगर जवळपास सर्वच नद्यांची उगमस्थान असतात! एकंदरीतच, विशाल, महाकाय, मजबूत अशी भौगोलिक ओळख असलेल्या डोंगराला कोण बरं खाईल? तो काय केकचा किंवा पनीरचा तुकडा थोडाचं आहे!      उंदीर, ससे, घुशी इत्यादी जमिनीत घर करून राहणारे प्राणी हे कदाचित पोखरून काढतील, पण त्यांच्या गरजेपुरतच. त्यामुळे सर्व डोंगर त्यांच्यामुळे खाल्ला जातो आहे, यात शंका आहे!      मग कोण बरं खात असेल डोंगराला?      उत्तर तुम्हालाही ठाऊक आहे; पृथ्वीच्या कुशीत निपजलेला तिचा सर्वात हुशार पुत्र, मनुष्य!      मैदानावरची माती कमी पडली, म्हणून नदी उपसली, नदी कमी पडली, म्हणून मग आता डोंगर पोखरायला सुरुवात झाली. कधी रस्ते बांधायला दगड हवेत, तर कधी खनिजाची गरज असते, कधी डोंगराच...