Posts

Showing posts from September, 2024

जिच्या हाती पाळण्याची दोरी...

जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिलाच करावी लागते वेळेची चोरी, चुकत बिलकुल नाही बिचारी, पण घरातल्या सर्वांना म्हणते सॉरी. जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच करते भाजी-भाकरी, राणी बनून येते घरी, पण प्रत्यक्षात करते चाकरी. जिच्या हाती पाळण्याची दोरी, कधीच फिटणार नाही तिची उपकार उधारी, कारण, तीच देते संस्कारांची शिदोरी,👣 आणि तीच माऊली जगाला उद्धारी! Wishall 🖋️