Posts

Showing posts from 2019

Waterfall

Image
जिवंत धबधबा सुंदर नितळ धबधबा न्हाऊ घाली जणू शंभू देवा निसर्गाची किमया पहा जसा पिंडीवर अभिषेक व्हावा 🙏🏻 प्रत्येक थेंब जणू माणिक मोती, पडताना असते प्रत्येकाला गती, असते कदाचित थोडी भीती, पडल्यावर बहरते ही काळीं माती। थेंब हे पारदर्शक स्वतः तरी निर्माण करतात सप्तरंग लाभता सुर्यसंग खुलतात हे नभी रंग निर्जीव असती घटक सारे तरी जिवंत ही प्रवाहधार, सामावून ही सारी पंचतत्व, बनते सृष्टीचा आधार. - विशाल नामदेव पाटील

Planet Mangal

Image
मंगल मंगल घूमता है बिचारा अपनी कक्षामें, न उसको कोई नाम, भा गए उसके लाल रंग को, दे दिया मंगल नाम। इतना सुंदर रूप है उसका। क्यों करवाएगा वो इंतेजार? डाल दिया है कुंडली में उसको शादी में विघ्न समाचार। मंगल होती है शादी मंगल होता है मुहरत मंगल सब गुण गान मंगल हो जाये जब इंसान तो, तो रुक जाए ये शादी संधान 😂😂😂 - विशाल नामदेव पाटील

Humming Bird

Image
Hummingbird सरसावुन पुढे पंख  उडला हा  विहंग सुर्याचे तप भंग ग्रहण घाली हा नटरंग उडणे आणि उगवणे  नित्याचे दोघानाहि काय त्याचे? स्वधर्म पाळती नित्य एक मर्त्य एक सत्य पाखरांस या ठाऊक का असावे? नभांगनी त्याचे रंगीत भ्रमण व्हावे क्षण असे लोभस असती अनेक  निसर्गाची जनु मुक्त रंगफेक  Sunlight passing through the wings of a Black Jacobin Hummingbird forms a prism of rainbows. (Photo: Christian Spencer) Special Thanks to my dear friend Mr. Yogesh Rathod for sending me this photo. - Wishall

Pursuit of Happyness = आनंदाच अंकगणित

Image
Pursuit of Happyness  =  अंकगणित  आनंदाचं                 "दुनिया बनानेवाले काहे को दुनिया बनाई , क्या तेरे मन में समाई  "  असा प्र्श्न माणसाला त्याच्या आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर पडतोच. खासकरुन जेंव्हा माणूस  दुःखाच्या  दरीत पडलेला असतो.  ह्या संसारच प्रयोजन काय हा एक आध्यात्मिक ,  वैज्ञानिक   तसेच तात्विक विषय आहे. पण  समजा जरी ह्या प्रश्नाच समाधानकारक उत्तर  मिळालंच तरी त्या कठीण परिस्थितीतून बाहेर कसं पडाव हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. का? हा प्रश्न सोडवल्या कसं ? हे उत्तर मिळेलच असे नाही. जीवनाच्या एका टप्प्यावर जेंव्हा माणसाचे आर्थिक प्र्श्न कठिन होत जातात तेव्हा कौटुम्बिक, सामाजिक प्र्श्नही त्यामागे शेपटासारखे येतात. अशा  कठीण  परिस्थितीत  सकारात्मक  विचार  करून, न हरता, जिददीने आपला संघर्ष सुरु ठेवावा लागतो ह्या संघर्षबरोबर स्वप्नही पाहत राहायची, आपल्यावर विश्वास असणाऱ्या आपल्या माणसांना सांभाळत आपल्या  आनंदाचं अंकगणित...