ऑनलाईन शाळा
खूप आठवते मला माझी खरी खुरी शाळा, तो मोकळा वर्ग अन् सुंदर अक्षराचा फळा, ती पहिली घंटा, ती प्रार्थना अन् परिपाठ, ती प्रतिज्ञा अन् राष्ट्रगीत उभे राहून ताठ! आता मात्र कोरोना भीतीने शाळा झाली बंद, घरीच बसून शोधावे लागतात नवनवीन छंद, ना वर्ग, ना फळा, ना प्रार्थना, ना परिपाठ, आता सुरू झालाय ऑनलाईन शाळेचा घाट! तो छानसा गणवेश अन् नव्या पुस्तकांचा सुवास, मस्ती आणि उचापत्यांनी दिलेला शिक्षकांना त्रास, आता मात्र जो तो असतो त्याच्या घरास, तोच कॉम्प्युटर, तोच मोबाईल अन डोळ्यांना स्क्रीन चा त्रास! भोलानाथ, आता नाही म्हणणार परत की, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय! पण पुन्हा एकदा खरी खुरी शाळा सुरू करू शकाल का ? Wishall 🖋️🌼 Picture Credit: The Hindu Newspaper