Posts

Showing posts from 2022

१ मे : कृतज्ञ आठवण

Image
मे महिन्याचा हा पहिला दिवस. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना सोबतच महाराष्ट्रातील बहुसंख्य शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या पास - नापास किंवा निकालाचा दिवस!! शाळेत असताना या दिवशी आनंद, उत्साह आणि थोडी भीती असं सर्वच वाटायचं!  लहानपणी ह्या दिवशी खूप कौतुक वर्षाव व्हायचा... मोठे काका , लहान काका , आईवडील, आजी आजोबा , आत्या, भाऊ बहिणी, मित्र आणि नातेवाईक मंडळी आनंदाने चौकशी करायचे. माझे मोठे काका कै. संभाजी पाटील ( दाजभाऊ) मला आजच्या दिवशी विशेष आठवतात. प्रत्येक निकालाला मला सोबत घेवून मिठाईच्या दुकानातून घेवून दिलेला पेढ्याचा मोठा बॉक्स त्यांच्या प्रेमाने आणि कौतुकाने ओतप्रोत भरलेला असायचा!  मोठा भाऊ शिकला, पुढे गेला की त्याने लहानांना आणि त्यांच्या मुलांना शिकवावे, आणि प्रगतीच्या साखळीत एकमेकांना वर खेचावे ही ताई तात्यांची ( आजी - आजोबांची) शिकवण माझ्या दोन्ही मोठ्या काकांनी ( श्री. केशव पाटील आणि कै. संभाजी पाटील) आणि काकूंनी (सौ. रंजना पाटील आणि गं. भा. भारती पाटील) निष्ठेने पाळली! आपल्या लहान बहीण भावांना आणि त्यांच्या मुलांनाही हवा तो आधार आणि पाठबळ दिले! मी ह्या कुटु...

पर्णवाट

Image
पर्णवाट ही अनंताची, जाई थेट सूर्यापाशी, अबोली ह्या संध्यासमयी, पृथ्वी सूर्याशी सांकव साधी! सांकव = पूल अनंत= अगणित/