Posts

Showing posts from November, 2019

Waterfall

Image
जिवंत धबधबा सुंदर नितळ धबधबा न्हाऊ घाली जणू शंभू देवा निसर्गाची किमया पहा जसा पिंडीवर अभिषेक व्हावा 🙏🏻 प्रत्येक थेंब जणू माणिक मोती, पडताना असते प्रत्येकाला गती, असते कदाचित थोडी भीती, पडल्यावर बहरते ही काळीं माती। थेंब हे पारदर्शक स्वतः तरी निर्माण करतात सप्तरंग लाभता सुर्यसंग खुलतात हे नभी रंग निर्जीव असती घटक सारे तरी जिवंत ही प्रवाहधार, सामावून ही सारी पंचतत्व, बनते सृष्टीचा आधार. - विशाल नामदेव पाटील