जिच्या हाती पाळण्याची दोरी...
जिच्या हाती पाळण्याची दोरी,
तिलाच करावी लागते वेळेची चोरी,
चुकत बिलकुल नाही बिचारी,
पण घरातल्या सर्वांना म्हणते सॉरी.
जिच्या हाती पाळण्याची दोरी,
तीच करते भाजी-भाकरी,
राणी बनून येते घरी,
पण प्रत्यक्षात करते चाकरी.
जिच्या हाती पाळण्याची दोरी,
कधीच फिटणार नाही तिची उपकार उधारी,
कारण, तीच देते संस्कारांची शिदोरी,👣
आणि तीच माऊली जगाला उद्धारी!
Wishall 🖋️