गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी... आठवणींची ओझी वहावी कोणी? संवेदनशील मन... जणू लहान मुंगी... आठवणींची ओझी उचलण्यात गुंगी 🐜 आठवणींचा आकार, भला आहे मोठा, मुंगीला मायेचा, नाही कधी तोटा. मन मुंगी ही चावे कधीतरी, आठवतात प्रसंग आणि कोणीतरी 🐜 गेले ते दिवस राहिल्या आठवणी, आठवणींची ओझी वहावी कोणी!