Posts

Showing posts from 2020

स्वाती: चैतन्याचा झरा

Image
काही दिवसांपूर्वी धुळे बस स्थानकात जाण्याचा योग आला. अनेक वर्षांनी एक कॉलेज ची मैत्रीण तसेच बहीण तिथे आगर प्रमुख म्हणून कार्यरत आहे, स्वाती पाटील.  स्वाती Officer झाल्यानंतर कदाचित मी पहिल्यांदाच तिला भेटणार होतो. कशी असेल, किती बदलली असेल असे अनेक प्रश्न डोक्यात होते. चौकशी करत करत तिच्या केबिन मध्ये गेलो तर समोर ही प्रसन्न मूर्ती विराजमान होती. अगदी तशीच जशी कॉलेज ला होती. जराही नाही बदललेली.  टापटीप ठेवलेलं office, येणाऱ्या जाणाऱ्या स्टाफ ला योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन, कधी गोड बोलुन तर कधी अधिकार वाणीने ती सर्वांच्या प्रश्नाची उत्तरं लीलया देत होती. तिच्या कार्य शैलीत हुशारी, आत्मविश्वास , आत्मसन्मान आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी दिसत होती.  कोरोना काळात आम्ही किती मेहनतीने काम केली, दिवसरात्र एक करून स्थलांतरित मजुरांना पोहचवले इत्यादी सांगताना तिचा उत्साह अभिमानाने ओसंडून वाहत होता. पण लहान मुलीची (माहीची) काळजी घेवू शकले नाही हे सांगताना तिच्यातली आई ही तेवढीच आर्त होती. आसपास च्या गप्पा झाल्यावर, अध्यात्म ,भूतकाळातील काही आठवणी...

Customized शुभेच्छा 💝💌🙏

Image
आजकाल सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडतो. सुंदर, झगमगीत, आकर्षक, आशयघन मजकुराच्या, रंगीत आणि कधी कधी संगीतमय शुभेच्छा. सुरुवातीला अनोख्या (unique) वाटणाऱ्या ह्या शुभेच्छा अनेक मोबाईल मधून फॉरवर्डचा प्रवास करून नंतर नंतर खूपच परिचित होवून जातात. मग त्या आपण वाचतही नाही. तश्याच एकाच्या दुसऱ्याला आणि दुसऱ्याच्या पहिल्या अन् तिसऱ्या व्यक्तीला सढळ हाताने पुढे पाठवतो. फार कमी लोक मन लावून सर्व शुभेच्छा वाचत असतील आणि योग्य तेवढाच आणि योग्य त्या ठिकाणी पाठवत असतील.... मग कोणासाठी दोन ओळींचा का असेना खास काही (customised message) लिहिण्याचा प्रश्न दूरच राहिला. तार अन् टपाल पत्राच्या काळानंतर आधुनिक संपर्क क्रांतीनंतर लोक अजून जवळ येतील अस वाटत असावं अनेकांना पण झालं त्या विपरीतच, लोक अजून दूर गेलेत. हा विरोधाभास च म्हणावा. हे अगदी त्या गोष्टी सारखंच झालं ना... ज्यात स्पीडब्रेकचा शोध लागल्यावर गाडी अगदी वेगाने चालवू लागलो आपण. कारण आपण हवा तेंव्हा , हवा त्या वळणावर वा उतारावर वेग नियंत्रित करू शकतो. पण नात्यांचं तसं नसतं ना... नाते संवेदनशील असतात, अगदी झाड वेलींसारखी, त्यांना वेळो...

ऑनलाईन शाळा

Image
खूप आठवते मला माझी खरी खुरी शाळा, तो मोकळा वर्ग अन् सुंदर अक्षराचा फळा, ती पहिली घंटा, ती प्रार्थना अन् परिपाठ, ती प्रतिज्ञा अन् राष्ट्रगीत उभे राहून ताठ! आता मात्र कोरोना भीतीने शाळा झाली बंद, घरीच बसून शोधावे लागतात नवनवीन छंद, ना वर्ग, ना फळा, ना प्रार्थना, ना परिपाठ, आता सुरू झालाय ऑनलाईन शाळेचा घाट! तो छानसा गणवेश अन् नव्या पुस्तकांचा सुवास, मस्ती आणि उचापत्यांनी दिलेला शिक्षकांना त्रास, आता मात्र जो तो असतो त्याच्या घरास, तोच कॉम्प्युटर, तोच मोबाईल अन डोळ्यांना स्क्रीन चा त्रास! भोलानाथ, आता नाही म्हणणार परत की, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय! पण पुन्हा एकदा खरी खुरी शाळा सुरू करू शकाल का ? Wishall 🖋️🌼 Picture Credit: The Hindu Newspaper

Generations = Helix

Image
Generations = Helix Generations are like circle if viewed from top side. But if you view them from 3-D point of view , they are like helix. Each generation represents a round with a complete circle but at a certain advanced  and elevated level. Isn't it a reason that DNA that carry genes are in helical shape? 🤓 You are the product of your history, rather integration of your ancestral traits are derived within oneself. You will also leave the similar legacy to your next generations through the skill set you possess. That skill may be writing, painting, cooking, sewing, singing or anything else. You pass it in two forms, tangible or intangible. Tangible heritage can be touched. Intangible heritage cannot be touched. You pass the traits directly or indirectly.  Live with love, leave with legacy 💖👸🏻👍🏻