स्वाती: चैतन्याचा झरा
काही दिवसांपूर्वी धुळे बस स्थानकात जाण्याचा योग आला. अनेक वर्षांनी एक कॉलेज ची मैत्रीण तसेच बहीण तिथे आगर प्रमुख म्हणून कार्यरत आहे, स्वाती पाटील.
स्वाती Officer झाल्यानंतर कदाचित मी पहिल्यांदाच तिला भेटणार होतो. कशी असेल, किती बदलली असेल असे अनेक प्रश्न डोक्यात होते. चौकशी करत करत तिच्या केबिन मध्ये गेलो तर समोर ही प्रसन्न मूर्ती विराजमान होती. अगदी तशीच जशी कॉलेज ला होती. जराही नाही बदललेली.
टापटीप ठेवलेलं office, येणाऱ्या जाणाऱ्या स्टाफ ला योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन, कधी गोड बोलुन तर कधी अधिकार वाणीने ती सर्वांच्या प्रश्नाची उत्तरं लीलया देत होती. तिच्या कार्य शैलीत हुशारी, आत्मविश्वास , आत्मसन्मान आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी दिसत होती.
कोरोना काळात आम्ही किती मेहनतीने काम केली, दिवसरात्र एक करून स्थलांतरित मजुरांना पोहचवले इत्यादी सांगताना तिचा उत्साह अभिमानाने ओसंडून वाहत होता. पण लहान मुलीची (माहीची) काळजी घेवू शकले नाही हे सांगताना तिच्यातली आई ही तेवढीच आर्त होती.
आसपास च्या गप्पा झाल्यावर, अध्यात्म ,भूतकाळातील काही आठवणी आणि भविष्यातले काही प्लॅन्स पण शेअर झाले. मित्रांच्या आठवणी, दर आठवड्याला एक तरी कॉल असावा असा तिचा विचार पण वेळ मिळत नसल्याची अडचण इत्यादी अनेक गप्पा पण झाल्या. त्या गप्पा संपल्या नसत्या पण कालमर्यादा पाळत आटोपत घ्यावं लागलं.
गप्पा मारता मारता सहज तिने एक सुंदर डिझाईन काढलं होत.मला सहज आठवले की तिच्या त्या कार्यकुशल हातांनी एकदा माझी emergency dressing पण केलेली होती.
अनेक वर्षांनी भेटलेली आपली जवळची व्यक्ती, जीने आपल्यासोबत कॉलेज केलं, प्रोजेक्ट केला, सूत्रसंचलन इत्यादी केले, ती अशी उच्च पदावर गेल्यावर किती प्रभावी पणे काम करते आहे हे पाहून एक ्परेराण आणि समाधान मिळालं.
स्वातीच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रार्थना आपोआपच निघाल्या 🙏🌼🇮🇳
Comments
Post a Comment