Customized शुभेच्छा 💝💌🙏


आजकाल सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडतो. सुंदर, झगमगीत, आकर्षक, आशयघन मजकुराच्या, रंगीत आणि कधी कधी संगीतमय शुभेच्छा. सुरुवातीला अनोख्या (unique) वाटणाऱ्या ह्या शुभेच्छा अनेक मोबाईल मधून फॉरवर्डचा प्रवास करून नंतर नंतर खूपच परिचित होवून जातात. मग त्या आपण वाचतही नाही. तश्याच एकाच्या दुसऱ्याला आणि दुसऱ्याच्या पहिल्या अन् तिसऱ्या व्यक्तीला सढळ हाताने पुढे पाठवतो.

फार कमी लोक मन लावून सर्व शुभेच्छा वाचत असतील आणि योग्य तेवढाच आणि योग्य त्या ठिकाणी पाठवत असतील.... मग कोणासाठी दोन ओळींचा का असेना खास काही (customised message) लिहिण्याचा प्रश्न दूरच राहिला.

तार अन् टपाल पत्राच्या काळानंतर आधुनिक संपर्क क्रांतीनंतर लोक अजून जवळ येतील अस वाटत असावं अनेकांना पण झालं त्या विपरीतच, लोक अजून दूर गेलेत. हा विरोधाभास च म्हणावा.
हे अगदी त्या गोष्टी सारखंच झालं ना... ज्यात स्पीडब्रेकचा शोध लागल्यावर गाडी अगदी वेगाने चालवू लागलो आपण. कारण आपण हवा तेंव्हा , हवा त्या वळणावर वा उतारावर वेग नियंत्रित करू शकतो.
पण नात्यांचं तसं नसतं ना... नाते संवेदनशील असतात, अगदी झाड वेलींसारखी, त्यांना वेळोवेळी पाणी नाही घातलं की ती कोरडी पडतात, त्यांची पानं गळून पडतात.
त्यांना थोडा का होईना पण वेळ द्यावा लागतो, चौकशी करावी लागते, जिव्हाळा जपावा लागतो. चला, तर मग, उचला तो मोबाईल आणि द्या आपल्या जिवलग मंडळींना customised शुभेच्छा 🙏🌼😀💝

लक्षात ठेवा: Efforts are most beautiful 🖋️

Comments

Popular posts from this blog

निधीचा गृहप्रवेश

जिच्या हाती पाळण्याची दोरी...

स्वाती: चैतन्याचा झरा