Ashich Pan Vishesh Observations.
असच पण विशेष : काही निरीक्षणे
- "शाळा कोणतीही असु देत हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड किंवा इतर कोणतीही; शाळेबाहेर ऐकु येणारा गोंगाट हा सर्व ठिकाणी सारखाच असतो! "
- त्याचप्रमाणे, नवरा अणि बायको कुठल्याही प्रांतातले असू दया, त्यांची खुसपुस तसेच भांडण सारखीच वाटतात.
- माणसाचे जीवन म्हणजे आसक्ति पासून ते विरक्ति पर्यंतचा प्रवास असतो. लहानपणी चॉकलेट अणि खेळण्यांमधे गुंतणारा माणुस, मोठा झाल्यावर वेगळ्या गोष्टीत गुंतत जातो. आणि शेवटी हातात सर्व असलं तरी त्याच मन लागत नाही... तेथेच विरक्तिचा प्रवास सुरू होतो.
- शिक्षकांना आवडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षकही आवडतेच असतात. न आवडणाऱ्याच्या बाबतीत पण तेच असतं.
- रस्त्यावरच्या कचऱ्याची तक्रार करणारा, स्वता: त्या रस्त्यावर कचरा करतांना मागे पुढे पाहत नाही.
- पुण्यात माणसाच्या डोक्याची मंडई होते, तर मुंबईत डोक्याची दही होते.
- माणूस अर्थशास्रीय गुंत्यात असेल तर त्याला मैत्रीचा इतिहास आठवतो आणि एकदा का परिस्थिती सावरली की तोच माणूस दुसऱ्या ग्रहावरचा वाटु लागतो.
- बुद्धिबळाचा डाव खेळत नसलेल्या माणसालाच जास्त चाली सुचतात. बघणारा खेळायला लागल्यावरही हाच नियम लागू होतो.

Good one! :)
ReplyDeleteThanks brother 😊
DeleteYou said true things.Nice
ReplyDeleteThanks Ashwinee 😊
DeleteThanks Amita!
ReplyDeleteAll are actually truee...Mast...
ReplyDeleteGreat lines.....:)
ReplyDeleteThnks all :-)
ReplyDelete👌
ReplyDeleteNice Vishal sir keep it up this is really great work..
ReplyDelete