Waterfall


जिवंत धबधबा



सुंदर नितळ धबधबा
न्हाऊ घाली जणू शंभू देवा
निसर्गाची किमया पहा
जसा पिंडीवर अभिषेक व्हावा 🙏🏻

प्रत्येक थेंब जणू माणिक मोती,
पडताना असते प्रत्येकाला गती,
असते कदाचित थोडी भीती,
पडल्यावर बहरते ही काळीं माती।

थेंब हे पारदर्शक स्वतः
तरी निर्माण करतात सप्तरंग
लाभता सुर्यसंग
खुलतात हे नभी रंग

निर्जीव असती घटक सारे
तरी जिवंत ही प्रवाहधार,
सामावून ही सारी पंचतत्व,
बनते सृष्टीचा आधार.


-विशाल नामदेव पाटील

Comments

  1. छान सुंदर कविता

    ReplyDelete
  2. सुंदर..अजून तरल करता येईल..in future. Happy writing

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निधीचा गृहप्रवेश

जिच्या हाती पाळण्याची दोरी...

स्वाती: चैतन्याचा झरा