आजोबा
आज दिनांक ५.०५.२०२५ रोजी माझ्या आजोबांची ( वडिलांच्या वडिलांची : तात्यांची कै. पुंडलिक धोंडू पाटील) पुण्यतिथी आहे... त्यांच्या आठवणीत लिहिलेल्या जुन्या ओळी त्यांना समर्पित.
आजोबा
सुरकुत्या सुंदर हातांचा
स्पर्श तो आजही आठवे
अनुभवांचा वारसा जेंव्हा
पाठीवर थापटे...
थरथरते अनुभवी बोल ते,
सांगती अनमोल उपदेश,
कधी चिंता, कधी प्रेम,
जीवनाचा दुर्मिळ संदेश..
वडिलांचे वडील तुम्ही
तरीही आई प्रमाणे केली माया
वटवृक्ष बनून घराचे
दिली सदैव आम्हा छाया!!!
विशाल पाटील✍🏻
Comments
Post a Comment